श्रीरामपुरातील आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

गौरव साळुंके
Monday, 28 September 2020

घोगरगाव (ता. नेवासे) येथील आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी कमलाकर शिरसाट यांनी केली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : घोगरगाव (ता. नेवासे) येथील आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी कमलाकर शिरसाट यांनी केली आहे. संबंधित विभागाने अतिक्रमण तातडीने काढावे, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले असून, आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली आहे. अन्यथा ५ ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार 
श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील वडाळा महादेव येथील खडी क्रशर परिसरातील कसार वस्ती येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. मागील काही दिवसांत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. बिबट्याने पाळीव कुत्री, शेळ्या, मेंढ्यांसह कालवडीवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. 

परिसरातील गोरख खंडागळे यांच्या शेतवस्तीवर काल रात्री बिबट्याने हल्ला चढवून शेळी फस्त केली, तसेच हल्ल्यात कालवडही जखमी झाली. खंडागळे यांनी हल्ल्याची माहिती सकाळी वन विभागाला दिली. आज सकाळी वनाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for removal of encroachment on Ambedkar Road