esakal | विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या तगाद्याने पारनेरमध्ये पालक चिंताग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for student admission fees from schools and colleges

शाळा- महाविद्यालयांनी पालकांकडे शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. फी जमा केली नाही तर मुलाचा प्रवेश रद्द होईल, असा दमही दिला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या तगाद्याने पारनेरमध्ये पालक चिंताग्रस्त

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : शाळा- महाविद्यालयांनी पालकांकडे शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. फी जमा केली नाही तर मुलाचा प्रवेश रद्द होईल, असा दमही दिला जात आहे. कोरोना संकटामुळे पालक सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे फी कशी भरावी, अशी चिंता त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे सहा महिन्यांपासून शाळा- महाविद्यालये बंद आहेत. नव्याने प्रवेशप्रक्रिया मात्र सुरू आहे. पहिली, 11वी, तसेच पदवीधर विद्यार्थ्यांनी पुढील वर्षात प्रवेश घेतले आहेत, तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. शाळा- महाविद्यालये फी मागत आहेत. अनेक ठिकाणी प्रवेश घेतानाच तशी मागणी होते. 

शाळा- महाविद्यालये सुरू नाहीत, मग फी कशाची? ऑनलाइन अभ्यासतही फारशी प्रगती नाही. त्यामुळे फी कमी करावी किंवा माफ करावी, अशी मागणी अनेक पालकांकडून होत आहे. 

सध्या अनेक व्यवसाय बंद आहेत. काही नुकतेच सुरू झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही अडचणीत आहेत. एवढ्यात शाळा, महाविद्यालये सुरू होतील याचीही शक्‍यता नाही. त्यामुळे सवलतीची मागणी होत आहे. 


आम्ही कोणाकडेच फी मागत नाही. गेल्या वर्षाचीच फी अनेकांकडून येणे बाकी आहे. काही प्रमाणात ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. सरकारी पातळीवर शैक्षणिक वर्ष बदलण्याचा विचार सुरू आहे. पालकांच्या अडचणीचा विचार करून, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर निर्णय घेऊ. 
- गीताराम म्हस्के, संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य, पारनेर पब्लिक स्कूल 

संपादन : अशोक मुरुमकर