esakal | पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा न केल्यास तहसील कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश’
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for visit of Akole taluka by the Guardian Minister and Collector

अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा न केल्यास तहसील कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश’

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.

शासकीय विश्रामगृह अकोले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुरुवातीला विनय सावंत यांनी स्वागत करून पत्रकार परिषदेचा उद्देश सांगितला.

यावेळी डॉ. अजित नवले म्हणाले की,कोरोनाचे रुग्ण आढळून आले की,दोन चार कार्यकर्ते बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतात.त्यामध्ये गोर गरीब जनतेचे हाल होत असून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न तयार होत आहे.मुळात बंद हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव पर्याय नाही.कोरोनाच्या टेस्ट वाढविणे गरजेचे आहे,कोव्हीड सेन्टर अथवा कोव्हीड हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे.

कोरोनाचे रुग्णासाठी बेड्सची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.सुरूवातीला अकोले तालुक्यात रुग्ण अतिशय कमी होते,आता मात्र संगमनेर च्या पुढेही ही संख्या जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे.रुग्णाच्या टेस्ट घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट लवकर येत नाही,त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असून टेस्ट चे रिपोर्ट लवकर मिळावे या साठी ही सुविधा अकोले तालुक्यातच व्हावी.तालुक्यातील कोव्हीड सेन्टर ची अवस्था फार दयनीय आहे तेथे रुग्णांना चहा,नाश्ता जेवण मिळत नसून त्यांना एक प्रकारची शिक्षा मिळत आहे.

आदिवासी भागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अगस्ति कारखान्याने कोव्हीड सेन्टर सुरू करून पुढाकार घेतला.त्याच प्रकारे पतसंस्था,सोसायटी,दूध डेअरी,उद्योजक,व्यावसायिक,सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व विरोधक यांनी पुढे येऊन कोव्हीड सेन्टर सुरू करावे.राजूर,कोतुळ,समशेरपूर ,भंडारदरा या ठिकाणी कोरोना टेस्ट घेण्यासाठी सुविधा उपलब्द होणे गरजेचे आहे.अकोले येथे उप जिल्हा रुग्नालय,राजूर येथे चांगल्या सुविधा असलेले रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजकारण बाजूला ठेवून, श्रेयवाद लक्षात न घेता,मानपान बाजूला ठेवून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी,लोक प्रतिनिधीनी,व विरोधकांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी एकत्र यावे.

प्रशासन जर आरोग्य यंत्रणा उभारण्यास सक्षम नसेल तर आरोग्य साधनाचा तुटवडा कमी असेल तर समाजामधून आर्थिक निधी उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,समाजाच्या सहभागाशिवाय हे शक्य होणार नाही,असे आवाहन त्यांनी केले.तसेच पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील कोरोणाची परिस्थिती हाताळण्यासाठी येत्या आठ दिवसात दौरा केला नाही तर आम्ही आत्मक्लेश करू असा इशारा डॉ.अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.

संपादन : अशोक मुरुमकर