Ahmednagar : वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची निदर्शने

जळगाव : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबरला अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणाची चौकशी न करता कार्यरत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांना अटक करण्यात आली. या कारवाईचा वैद्यकीय अधिकारी व परिचारिका संघटनेतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शनिवारी (ता. १३) येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने करीत कामकाज केले.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षा सुरेखा लष्करे, उपाध्यक्षा माया सोलंकी, जयश्री जोगी, डॉ. संदीपकुमार पाटील आदींनी यात सहभाग घेतला. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालये, आरोग्य केंद्र यातील सर्वच जण आंदोलनात सहभागी झाले आहेत.

अहमदनगर येथील रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी चौकशी न करता कार्यरत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांना अटक करण्यात आली. याचा आम्ही निषेध करीत आहे. त्यांचे निलंबन मागे घ्यावे, लावलेले कलम रद्द करावे, अशी मागणी आहे. सोमवारपासून आम्ही कामबंद आंदोलन करू.

- सुरेखा लष्करे, अध्यक्षा

वैद्यकीय अधिकारी व परिचारिका संघटना.

loading image
go to top