
संगमनेर : पिंपरणे (ता. संगमनेर) येथील कमलबाई बन्सी राजपूत या गरीब महिलेची झोपडी जळून खाक झाली होती. यामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही त्याच झोपडीत त्या राहात असून, आगीत जळालेल्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कमलबाई यांना मदतीची गरज आहे.