esakal | बदली झाल्यानंतरही 14 कर्मचारी जागीच; जिल्हा परिषद प्रशासनाच्या चौकशीत उघड 
sakal

बोलून बातमी शोधा

Despite being transferred to Nagar Zilla Parishad 14 employees remained on the spot

अहमदनगर जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला असला, तरी बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मूळ जागीच कार्यरत आहे.

बदली झाल्यानंतरही 14 कर्मचारी जागीच; जिल्हा परिषद प्रशासनाच्या चौकशीत उघड 

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : अहमदनगर जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला असला, तरी बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मूळ जागीच कार्यरत आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी केली असता, बदली झालेले 14 कर्मचारी मूळ जागेवर कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्हा परिषदेची बदलीप्रक्रिया राज्यात आदर्शवत ठरली. राज्यातील जिल्हा परिषदांनी त्याचे अनुकरण केले. बदल्यांत 42 प्रशासकीय, 136 विनंती व 74 आपसी, अशा 252 बदल्या झाल्या. त्यातील अनेक जण बदलीच्या ठिकाणी हजरही झाले. मात्र, प्रशासकीय व विनंती बदल्या झालेल्यांमधील काहींना अद्याप त्यांच्या मूळ जागीच कार्यरत आहेत. याबाबत "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने चौकशी केली असता, 14 कर्मचारी मूळ जागेवर कार्यरत असल्याचे समोर आले. या सर्वांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. 

दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभाग, कृषी विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहेत. 
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव सोळंके म्हणाले, की सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना नोटीस काढून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आपल्या पगारातून का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. 

मूळ जागी कार्यरत कर्मचारी 
सामान्य प्रशासन ः चार, ग्रामपंचायत ः एक, महिला बालकल्याण एक, अर्थ विभाग दोन, पशूसंवर्धन ः एक, बांधकाम विभाग एक, लघुपाटबंधारे विभाग ः दोन, आरोग्य विभाग ः एक.

संपादन : अशोक मुरुमकर