मी देवीभक्त आहे, देवीवरील श्रद्धाच मला येथे घेवुन येते

राजेंद्र सावंत
Saturday, 5 September 2020

मी देवीभक्त आहे. देवीवरील श्रद्धाच मला येथे घेवुन येथे. देवस्थानच्या विकास आराखड्यासाठी लागणारा निधी सरकारकडून आणला जाईल.

पाथर्डी (अहमदनगर) : मी देवीभक्त आहे. देवीवरील श्रद्धाच मला येथे घेवुन येथे. देवस्थानच्या विकास आराखड्यासाठी लागणारा निधी सरकारकडून आणला जाईल. पुढच्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेऊन देवीगडावर येऊ. विकासाचा देवस्थानने केलेला आराखडा अमंलात आणण्यासाठी कर्तव्यभावनेतुन देवस्थानसोबत आम्ही राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. 

आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र मोहटादेवी मंदिर परिसर विकास आराखडा बैठक संपन्न झाली. देवस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी आराखड्याबाबत सविस्तर माहीती दिली. त्यानंतर लंके यांनी सरकार आपले आहे. तुम्ही काळजी करु नका जगदंबा देवीच आपल्याकडुन हे कार्य करुन घेईल, असे सांगितले. 

मोहटादेवीच्या भक्तनिवास समोरील जागेमध्ये बहुउद्देशीय सभागृह, मंदिराकडे येणारा घाट रस्ता रुंदीकरण, संरक्षण कठडे व पादचारीमार्ग, मंदिर संरक्षण भिंती, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, वॉटर ट्रीटमेंट प्लॅनट, मंदिर परिसरामध्ये पथदिवे, मंदिरावर मंदिरात डेकोरेटिव्ह लायटिंग, सुवासिनी प्रसादालय अशा विविध विकासकामांना गती देण्याचे बैठकीत ठरले. यावेळी गोकुळ दौंड, रणजित बेळगे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, ज्ञानेश्वर दराडे, आजिनाथ आव्हाड, महादेव दहिफळे, अर्जुन धायतडक देवस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development plan meeting of Mohtadevi temple area under the chairmanship of MLA Nilesh Lanka