केंद्राच्या निधीवरुन आजी- माजी मुख्यमंत्री आमन- सामने

अशोक मुरुमकर
Monday, 19 October 2020

केंद्रातील भाजप सरकारकडून राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या निधीवरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमने- सामने आले आहेत.

अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारकडून राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या निधीवरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमने- सामने आले आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह विरोधीपक्षही आज दौरा करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करत आहेत. तर भाजपचे विरोधीपक्षनेते फडणवीस हे बारमतीत दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना फडणवीस यांनी राज्याने तत्काळ मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने केंद्राची वाट न पाहता शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी. पहिली जबाबदारीही राज्याचीच आहे, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातून पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. आम्ही माहिती गोळा करत बसणार नसल्याचेही त्यांनी सांगत भाजपला टोला लगावला आहे. शरद पवार यांनी काल सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्याकडेही मदत मागणार असल्याचे सांगितले आहे.

केंद्राने राज्याचे येणे वेळेत दिली तर केंद्राकडे हात पसरण्याची गरज लागणार नाही. विरोधी पक्षनेतेही या आधी सत्तेत होते. यात मी राजकारण करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांना नेमकी मदत किती द्यायची याची माहिती गोळा करत आहोत.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. मात्र, विरोधीपक्षाने केंद्र व राज्य असा दुजाभाव करु नये, असं म्हटलं आहे. अजूनही अतिवृष्ठाचा इशारा देण्यात आला असून काळजी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis and Uddhav Thackeray criticize each other from central funds