Maharashtra Politics : कोकणात जाणारे पाणी गोदावरीत आणणार, बाळासाहेब विखे यांचे स्वप्न पूर्ण करु : राधाकृष्ण विखे पाटील
Water Resources Department : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्याअंतर्गत कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुन्हा साकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अहिल्यानगर : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते.