esakal | शिर्डीतील लक्ष्मीपूजनात देश-विदेशातील भाविक अॉनलाईन सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

Devotees from home and abroad participate online in Lakshmi Pujan in Shirdi

लक्ष्मीची आळवणी करतात. यंदा तर साईसंस्थान प्रशासनाने लक्ष्मीपुजनासाठी पैशाची पाकिटे संकलीत करण्याची वेगळी व्यवस्था केली.

शिर्डीतील लक्ष्मीपूजनात देश-विदेशातील भाविक अॉनलाईन सहभागी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : जगाच्या पाठीवर अनेक देशात पसरलेला भक्त वर्ग आणि भाविकांची सर्वाधिक गर्दी असलेले देशातील प्रमुख देवस्थान असा साई समाधि मंदिराचा लौकीक आहे. आज येथे परंपरागत पध्दतीने लक्ष्मीपूजन झाले. देश विदेशातील शेकडो भाविकांनी ऑनलाईन पध्दतीने त्यात सहभाग घेऊन लक्ष्मीची करूणा भाकली. 

सुबत्तेसाठी साईबाबांकडे प्रार्थना देखील केली. सव्वा दोन हजार कोटींच्या ठेवी. चारशे साठ किलो सोने व साडेपाच हजार किलो चांदी असे वैभव असलेल्या साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाचा विधी सपत्नीक झाला. 

सदैव सुवर्णतेजाने तळपणाऱ्या साईसमाधी मंदिरात आज सोन्याचे ताट, सोन्याचा पाट, पळी पंचपात्र आणि निरंजनही सोन्याचे असा पुजेचा थाट होता. साईबाबांच्या समाधिला साक्षी ठेऊन झालेल्या या पुजेसाठी शिर्डीकरांनी पैशाची शेकडो पाकिटे ठेवली होती. साईंच्या दरबारात साक्षात लक्ष्मीचा निवास आहे. 

येथे वास्तव्यास असलेल्या लक्ष्मीची आपल्यावरही कृपा व्हावी. या अपेक्षेने दरवर्षी शिर्डीकर व देशभरातील भाविक पैशाची पाकिटे साईमंदिरातील लक्ष्मीपूजनासाठी देतात. पुजनानंतर ती त्यांना परत केली जाते. अनेक भाविक साईबाबांचा प्रसाद म्हणून देवघरात ठेऊन त्याचे पूजन करतात.

लक्ष्मीची आळवणी करतात. यंदा तर साईसंस्थान प्रशासनाने लक्ष्मीपुजनासाठी पैशाची पाकिटे संकलीत करण्याची वेगळी व्यवस्था केली. त्याद्वारे पाकीटे जमा करण्याचे जाहिर अवाहनही केले होते. कोविडमुळे यंदा लक्ष्मीपूजनासाठी अधिकारी वगळता अन्य कुणालाही साईमंदिरात प्रवेश देण्यात आला नाही.