

Journey of Faith Ends in Tragedy in Kannad Ghat
sakal
शेवगाव : छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रस्त्यावरील कन्नड घाटात बुधवारी (ता. ७) रात्री उशिरा झालेल्या भीषण मोटार अपघातात शेवगाव येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले. जखमींवर चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.