देवराम कुमकर हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. पक्षाच्या वतीने झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहीला आहे. पक्षाने दखल घेऊन कोषाध्यक्षपदावर केलेल्या निवडीमुळे काम करण्यास अधिक उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील वीरगाव येथील देवराम शंकर कुमकर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अकोले तालुका कोषाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र अकोले तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
देवराम कुमकर हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. पक्षाच्या वतीने झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहीला आहे. पक्षाने दखल घेऊन कोषाध्यक्षपदावर केलेल्या निवडीमुळे काम करण्यास अधिक उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, विजयसिंह थोरात, माणिकराव अस्वले, रेवणनाथ देशमुख, अशोक धात्रक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते. देवराम कुमकर यांचे कोषाध्यक्षपदावरील निवडीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अकोले तालुका काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.
संपादन : सुस्मिता वडतिले