गायनाने बिग बींची वाहवा मिळवणाऱ्या बालगायकाची ढवळपुरीत पेढेतुला

सनी सोनावळे
Thursday, 19 November 2020

ढवळपुरी (ता.पारनेर) येथे छोटा गायक श्री.जाधव याने 
आपल्या गायनाने जेष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, गायक आनंद शिंदे, यांनी या छोट्या मुलांच्या गायनाची स्तुती केली

टाकळी ढोकेश्वर : तीन वर्षाच्या श्री नावाच्या चिमुरड्याने आपल्या गायनाने ज्येष्ठ चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी यांच्यासह अनेक दिग्गजांना भुरळ घातली. सोशल मीडियावर त्याच्या गायनाचे खूप कौतुक झाले. श्रीच्या गायनाने ढवळपुरीचे नाव जगभरात पोहचले असल्याचे प्रतिपादन सरपंच डाॅ.राजेश भनगडे यांनी केले.

ढवळपुरी (ता.पारनेर) येथे छोटा गायक श्री.जाधव याने 
आपल्या गायनाने जेष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, गायक आनंद शिंदे, यांनी या छोट्या मुलांच्या गायनाची स्तुती केली. अनेक न्युज चॅनलवर श्री च्या गायनाचा कार्यक्रम प्रसारित केला गेला. त्यांच्या या गायनाच्या सोशल मीडियावरील व्हिडिओला जवळपास वीस कोटींपेक्षा जास्त लाईक मिळाल्या.

याबद्दल गायक श्रीची ग्रामस्थांनी पेढेतुला केली. त्यावेळी भनगडे बोलत होते. भनगडे म्हणाले,चंद्रकांत ढवळपुरीकराप्रमाणे श्री देखील गावाचे नाव पुढे नेईल. त्यांच्या या गायनाने गावाच्या लोकांना ही मोठा आनंद झाला आहे. 

या वेळी गायक श्री ची गावात मिरवणूक काढून पेढेतुला करण्यात आली. अनेक मान्यवरांनी त्यांस शुभेच्छा दिल्या. श्रीचे वडील तानाजी जाधव यांनी ढवळपुरी व ढवळपुरीच्या बारा वाड्यावर गाणे तयार केले. या गाण्याचाही लोकार्पण सोहळा भनगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

उपसरपंच संतोष चौधरी, महावितरण चे शाखा अभियंता ए.बी. भोंडवे, भागाजी गावडे, गोविंद कुटे, अहमद पटेल उपस्थित होते. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhawalpuri's name is spread all over the world