जनता कर्फ्यूबाबत कर्जत शहरामध्ये मतप्रवाह

नीलेश दिवटे
Tuesday, 18 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व्यापारी व नागरिकांच्या वतीने स्वयंफुर्तीने सोमवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला.

कर्जत (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व्यापारी व नागरिकांच्या वतीने स्वयंफुर्तीने सोमवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. त्याल्या संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र मंगळवारपासून शहरातील पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.

काल काही व्यापारी व नागरिकांनी कर्जत शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, नागरिकांची होणारी गर्दी, मास्क व सानिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष यामुळे दहा दिवस जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने व्यवसाय बंद आहेत. तसेच अनेकांचे हातावर पोट आहे. या लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच या बाबीचा विचार व्हावा, असे अनेकांनी मत व्यक्त केले होते.

तसेच जनता कर्फ्यु घ्यायचा की नाही याबाबत वेगवेगळे मतप्रवाह शहरात निर्माण झाले होते. तसेच प्रशासनाच्या वतीने स्वयंफुर्तीने ठेवायचे असेल तर हरकत नाही, असे मत आले होते. अखेर सर्वानुमते कोरोनाबाबत खबरदारी घेत सर्व नियम पाळीत शहरातील सर्व व्यवहार सुरू झाले असून जनता कर्फ्यु अथवा कडकडीत बंद पाळण्यात येणार नाही.
 

महसूल अथवा नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने त्याबाबत कुठलेही अवहन अथवा सूचना देण्यात आलेल्या नसून स्वयंफूर्ती ने बंद ठेउ शकता.

- नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different opinions in Karjat taluka regarding public curfew