निळवंडे कालव्याच्या खोदाईमुळे तुटलेल्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन जोडून देणार

शांताराम काळे
Thursday, 19 November 2020

दरवाढ सूची मान्य करण्याबाबत कार्यकारी संचालक, गोदावरी महामंडळ (औरंगाबाद) यांना पाच नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठविला.

अकोले : निळवंडे डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे तुटलेली पाइपलाइन जोडून देणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्य केल्याची माहिती ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी दिली. 

पांडे म्हणाले, की निळवंडे डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे निंब्रळ येथील 77, म्हाळादेवी 142, मेहेंदुरी 88, बहीरवाडी 29, उंचखडक 53, ढोकरी 24, टाकळी 34, गर्दनी 10, खानापूर 15, सुगाव खुर्द 20, कुंभेफळ येथील 10, अशा 502 शेतकऱ्यांच्या पाइपलाइन तुटल्या आहेत. त्या पुन्हा जोडून देण्याबाबतच्या शेतकरी व स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे जलसंपदा खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

दरवाढ सूची मान्य करण्याबाबत कार्यकारी संचालक, गोदावरी महामंडळ (औरंगाबाद) यांना पाच नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठविला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह आपण कार्यकारी संचालक व जलसंपदामंत्र्यांना हा प्रस्ताव त्वरित मान्य करण्याबाबत विनंती करण्याची मागणी केल्याची माहिती ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी दिली.

निळवंडे कालवाबाधितांच्या न्याय्य मागण्या मान्य करू, असे थोरात यांनी मान्य केल्याचे मीनानाथ पांडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The digging of Nilwande canal will connect the farmers' pipeline which was broken