
-अरुण नवथर
अहिल्यानगर : सोशल मीडियाद्वारे फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यातच आता डिजिटल अरेस्टचा धोकाही वाढला आहे. जिल्ह्यातील दोघांना डिजिटल अरेस्ट केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे, तसेच सोशल मीडियावर मैत्री करत अश्लिल व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचेही अनेक गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री करा पण जरा जपून, असे म्हणण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे.