

ACB officials inspect the residence of former pollution control officer Dilip Khedkar
esakal
पाथर्डी, :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी आज पहाटे नाशिक व अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा टाकला. खेडकर यांच्या विविध मालमत्तेचे कागदपत्रे ताब्यात घेत तपासणी केली. तपासणीत खेडकर कुटुंबाकडे १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. याप्रकरणी दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.