
आज त्यांनी येथे येऊन साई समाधिचे दर्शन घेतले. साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यास भेट दिली.
शिर्डी ः महिला गायब होण्याच्या घटनांचा पोलीसांना गांभीर्याने व तत्परतेने तपास करावा लागेल. शिर्डीतून गायब झालेल्या इंदोर येथील महिला दिप्ती सोनी यांचा साडेतीन वर्षानंतर शोध लागला.
या घटनेबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशी माहीती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आज त्यांनी येथे येऊन साई समाधिचे दर्शन घेतले. साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यास भेट दिली.
या वेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील व उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे आदि उपस्थीत होते.
ते म्हणाले, राज्यसभेच्या समिती पुढे देखील हा मुद्दा आला. या समितीने काही निर्देश दिले. गायब होणा-या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिका-यांनी तत्परतेने व गांभीर्याने तपास करावा. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
साईमंदिर परिसरातील चोरीचा घटना रोखण्यासाठी विवीध भाषा अवगत असलेले अधिकारी व पोलीस कर्मचारी नियुक्त करून पोलीस चौकी उभारली जाईल. येत्या 26 जानेवारी पासून हि चौकी सुरू करण्यात येईल.