तहसीलदार पवारांच्या बदलीपूर्वीच नव्या नावाची चर्चा!

pradeep pawar
pradeep pawaresakal

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : आठ महिन्यांपूर्वी आलेले तहसीलदार प्रदीप पवार यांच्या बदलीची चर्चा महिन्यापासून सुरू आहे. मध्यंतरी पवार यांच्याबाबत आलेल्या तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेतलीच; शिवाय महसूलमंत्र्यांनीही त्यांच्याबद्दल ‘विशेष’ चौकशी केल्याने, पवार यांची उचलबांगडी जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्थात, या बदलीला मुहूर्त मिळाला नसला, तरी नवीन तहसीलदार कोण येणार आणि कोणाला आणायचे, याचे सुप्त राजकारण चांगलेच रंगत आहे. तसे असेल तर पवार यांच्या बदलीने नेमके काय साध्य होणार, हाही प्रश्न पुढे येत आहे. (Discussion-of-transfer-Tehsildar-Pradip-Pawar-marathi-news-jpd93)

मर्जीतील तहसीलदारांसाठी ‘फिल्डिंग’

महेंद्र माळी यांनी तालुक्यात पावणेचार वर्षांचा कालावधी पूर्ण केला. त्यांनी किती व कसे काम केले, यापेक्षा ते येथे आहेत, याचा कोणाला त्रास होऊ दिला नाही, हेच त्यांच्या येथील यशाचे गमक राहिले. पवार यांची पहिली पोस्टिंग येथे आहे. पहिल्याच टप्प्यात झालेल्या चुका त्यांच्यासाठी शाप ठरल्या. त्यामुळे त्यांनी कामात बदल करीत शांतपणे लोकांना सामोरे जाण्याचे धोरण घेतले. अजनूज येथील शेतकऱ्यांचे अनुदान परत पाठविणे, कारवाई करू नका, असे वरिष्ठांचे आदेश असतानाही कारवाईसाठी नदीपात्रात मुक्काम ठोकणे, या बाबी पवार यांच्याविरोधात गेल्या. नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांना पाठबळ राहिले नाही. त्यातच महसूलमंत्र्यांकडून संधी मिळणार नसल्याची चर्चा असल्याने, पवार यांची बदली होणार, हे महसूलच्या गोटात ठामपणे सांगितले जाते.

काही नावेही पुढे येऊ लागली

पवार यांना १५ ऑगस्टची ‘डेडलाईन’ असल्याचे खात्रीशीररीत्या समजते. कदाचित ही चर्चा खरी ठरली आणि पवार श्रीगोंद्यातून गेले तर येथे कुणाला आणायचे, असेच थेटपणे बोलले जात आहे. त्यासाठी काही नेते, कार्यकर्ते व वाळूवाले राबत आहेत. आपल्याच मर्जीतील नवा अधिकारी यावा, यासाठी ही सगळी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. विशेष म्हणजे, काही नावेही पुढे येऊ लागल्याने, सगळेच ठरवून असले तर मग पवार हेच का नको, हाही प्रश्न आहे. प्रशासनाला मदत करणाऱ्या जनतेला अधिकारी कुणीही असले तरी घेणे-देणे नाही. तथापि, ज्यांना या अधिकाऱ्यांकडून फायदा करवून घ्यायचा आहे, त्यांची ‘फिल्डिंग’ यावेळी तरी भेदली जाईल का, याविषयी उत्सुकता आहे.

pradeep pawar
नेवाशात भाजपअंतर्गत वाद उफाळला! माजी आमदारांवर गंभीर आरोप

...तर काम करणे अवघड

श्रीगोंदे तालुक्यात येणारा अधिकारी कोणाच्या शिफारशीने आला, तर त्यास मोकळेपणाने काम करता येणार नाही. तहसीलदार पवार यांनाही तीन नेत्यांची शिफारसपत्रे होती, हे गुपित राहिलेले नाही. त्यामुळे नवीन अधिकाऱ्याच्या अनुभवाचाही काम करताना कस लागणार आहे.

pradeep pawar
साडूंची सासुरवाडीत करामत! सासऱ्यावर बलामत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com