Ahilyanagar NewsSakal
अहिल्यानगर
Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये पिंपळगाव माळवीत रस्त्याच्या हक्कावरून दोन कुटुंबांत झटापट; पोलिसांत गुन्हे दाखल
Land Road Clash : अहिल्यानगरमध्ये सामायिक रस्त्याच्या हक्कावरून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन परस्पर मारहाण झाली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पिंपळगाव माळवी : येथे सामायिक रस्त्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाचे रुपांतर शनिवारी (१२ जुलै) दुपारी हाणामारीत झाले. यामध्ये दोन कुटुंबांमध्ये परस्पर आरोप-प्रत्यारोप झाले असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

