esakal | वाद होता किरकोळ पण झाला खून
sakal

बोलून बातमी शोधा

The dispute was minor but the murder took place

रागाच्या भरात विशाल घरी जाऊन काठी घेऊन परत शनि चौकात आला. तोपर्यंत पंचायत समितीसमोरील रस्त्याने थोरात जात होते. विशालने पाठलाग करून त्यांना गाठले.

वाद होता किरकोळ पण झाला खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुरी : शहरातील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आज सायंकाळी किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. संजय सुगंधा थोरात (वय 54, रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. विशाल संभाजी लांडे (वय 25, रा. राहुरी) असे त्याचे नाव आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील शनि चौकात आज सायंकाळी किरकोळ वादातून थोरात व लांडे यांच्यात मारामारी झाली.

रागाच्या भरात विशाल घरी जाऊन काठी घेऊन परत शनि चौकात आला. तोपर्यंत पंचायत समितीसमोरील रस्त्याने थोरात जात होते. विशालने पाठलाग करून त्यांना गाठले.

काठीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यात डोक्‍यात काठीचा जोरदार प्रहार बसल्याने थोरात जागीच कोसळले. तातडीने त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.अहमदनगर 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image