
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक व नियमांनी होण्यासाठी या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करा, या विभागाचा मनमानी, हुकुमशाही व अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना दिल्या.