लोकहिताचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोचविणार

दौलत झावरे
Saturday, 5 December 2020

पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे.

अहमदनगर : पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.

जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना काऊ लिफ्टिंग मशिनचे वाटप करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, पशुसंवर्धन व अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख, सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, रामभाऊ साळवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगल वराडे आदी उपस्थित होते.

गडाख म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी पशुधन कमी असतानाच्या काळात जिल्हा परिषदेने पंजाबमधून रेल्वेने गायी आणून दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन दिले. जनावरांच्या बाजारात गाभण जनावरांची निश्‍चित माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अनेकदा फसवणूक होते. हे टाळण्यासाठी लोणी, काष्टी, घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारात सोनोग्राफी यंत्र बसविणार आहे. डॉ. सुनील तुंबारे यांनी प्रास्ताविक केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Cow Lifting Machine by Zilla Parishad President Rajshri Ghule