esakal | संगमनेर तालुक्यातील दिव्यांगांना वैश्विक डिजिटल कार्डचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of global digital cards to the disabled in Sangamner taluka

समाजातील दिव्यांग व्यक्ती या विशेष व्यक्ती आहेत. त्यांची सेवा म्हणजे मानवता व परमेश्वराची असल्याचे प्रतिपादन, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील दिव्यांगांना वैश्विक डिजिटल कार्डचे वाटप

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : समाजातील दिव्यांग व्यक्ती या विशेष व्यक्ती आहेत. त्यांची सेवा म्हणजे मानवता व परमेश्वराची असल्याचे प्रतिपादन, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संग्राम मतीमंद विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा मूकबधिर विद्यालयांच्या वतीने, वैश्विक डिजिटल कार्डचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील 184 अपंगांना वैश्विक डिजिटल कार्डचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे होते. ते म्हणाले, अपंगांना इतरांनी सातत्याने मदत करून मानवतेचे दर्शन घडवले पाहिजे. तीच खरी परमेश्वराची सेवा ठरणार आहे. दिव्यांग व अपंग या विशेष व्यक्तींसाठी पंचायत समितीत त्वरीत निदान कक्ष सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.

तालुक्यात राबवले गेलेले वैश्विक कार्ड अभियान राज्यभर राबवण्याची आवश्यकता आहे. या नव्या वैश्विक डिजिटल कार्डमुळे स्वतंत्र एसटी प्रवास सवलत कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, अपंग ओळख पत्र अशा वेगवेगळ्या कार्डांची गरज भासणार नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने संग्राम मतिमंद विद्यालयाच्यावतीने होणार्‍या उपक्रमांना साथ दिली जात असल्याचे नवनाथ अरगडे यांनी सांगितले.

यावेळी इंद्रजित थोरात, जिल्हा परिशद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. नामदेव गुंजाळ, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सूर्यकांत शिंदे, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, वाय. डी. देशमुख, विनायक दाभोळकर, जालिंदर लहामगे, पांडूरंग कासार, आनंद आल्ले, सुरेश म्हाळस, संजय मासाळ, प्रमोद राऊत, साहेबराव गुंजाळ, सुदाम राऊत आदि उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर