समाजरत्न आणि कोविड योद्धा पुरस्काराचे ३० डिसेंबरला वितरण

गौरव साळुंके
Monday, 7 December 2020

महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व समाजसेवा फाऊंडेशनच्या वतीने दिले जाणारे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व समाजसेवा फाऊंडेशनच्या वतीने दिले जाणारे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 30 डिसेंबरला समाजसेवक डॉ. रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे रामपाल पांडे आणि सुरज सुर्यवंशी यांनी सांगितले. 

पुरस्कार विरतण सोहळ्यासाठी महेश व्यास, कडूभाऊ काळे, किशोर निर्मळ, सुरेश वाबळे, बबन तागड उपस्थित राहणार आहे. यंदाच्या पुरस्कारानसाठी बारा समाजरत्न आणि चार कोविड योध्दाच्यांची निवड केली आहे. नामदेव देसाई, डॉ. वसंत जमधडे, भरतकुमार उदावंत, ज्ञानेश गवले, मंदा चव्हाण, बाळासाहेब रासकर, काकासाहेब कोयटे, अविनाश कुदळे, रभाजी वाघमारे, सुभाष वाघुंडे, निलकंठ तरकासे, विनय ढोले यांचा समावेश आहे. तसेच कोरोनाच्या संकटात समाजसेवा केलेल्या जीवन सुरूडे, प्रसन्न धुमाळ, वसुधा बुगदे, डॉ. तौफिक शेख यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Samajratna and Kovid Yodha Awards on 30th December