सरपंचाच्या पुढाकरातून ६०० कुटुंबांना सॅनिटायजर, मास्कचे वाटप

सनी सोनावळे
Tuesday, 15 September 2020

पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील सरपंच अशोक घुले यांच्या पुढाकारातुन गावासह परिसरातील वाड्यावस्तांवरील ६०० कुटुंबांना प्रत्येकी अर्धा लीटर सॅनिटायजर, कुटुंबांना कापडी मास्क, व्हिटॅमीनसी (रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील सरपंच अशोक घुले यांच्या पुढाकारातुन गावासह परिसरातील वाड्यावस्तांवरील ६०० कुटुंबांना प्रत्येकी अर्धा लीटर सॅनिटायजर, कुटुंबांना कापडी मास्क, व्हिटॅमीनसी (रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 

गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना व परिसरातील घुलेवस्ती, पुंडवस्ती, खंडोबावस्ती, भांबरेवस्ती, जगताप वस्ती मुंडेवस्ती या ठिकाणी घुले यांनी घरोघरी जावुन या वस्तूंचे वाटप केले आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढल्यामुळे हा सामाजिक उपक्रम राबविला असल्याचे घुले यांनी सांगितले.

कोरोना आजाराबाबत शासनाने जे नियम व पथ्य घालुन दिलेले आहे ते पाळले पाहिजे. तसेच कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवुन आपली आरोग्य तपासणी करण्यात यावी असे आवाहन घुले यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of sanitizer and masks to 600 families through Sarpanch initiative