जिल्हा बँक कुकडीच्या कारखान्याच्या पाठिमागे खंबीर, कर्डिलेंची ग्वाही

संजय आ. काटे
Saturday, 17 October 2020

कुकडी साखर कारखान्याच्या पाठीशी आपण कायम आहोत, कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू करावे बँक पूर्णपणे अर्थसाहाय्य करेल अशी ग्वाही माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी दिली. 

श्रीगोंदे : कोरोना संकटाने सगळ्यांचेच अर्थकारण कोलमडले. अशा परिस्थितीत जिल्हा सहकारी बँकेने शेतकरी आणि साखर कारखान्यांना नियमात राहत कर्ज देण्याची भूमिका घेतली.  

कुकडी साखर कारखान्याच्या पाठीशी आपण कायम आहोत, कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू करावे बँक पूर्णपणे अर्थसाहाय्य करेल अशी ग्वाही माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी दिली. 

कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा 17 व्या गाळप हंगामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप व कर्डिले यांच्या हस्ते झाला. 

यावेळी कर्डीले म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेत कर्ज देताना पक्ष-पार्टी पाहिली जात नाही. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यास 90 कोटींचे कर्ज दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शेतकऱ्यांना 15 हजार कोटीचे पॅकेज दिले. त्यातून जिल्हा बँक शेतकऱ्यांना मदत करणार आहे.

पूर्वी जिल्हा सहकारी बँकेची ओळख कारखानदारांची बँक अशी होती पण आपण बँकेत संचालक म्हणून आल्यावर ही ओळख  शेतकऱ्यांची बँक म्हणून केली. 

संग्राम जगताप म्हणाले, की कुकडी साखर कारखान्याची शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असते. कोरोना मुळे अडचणी आल्या तरी कारखाना पुन्हा भरारी घेईल. कारखान्यात राहुल जगताप यांचे चांगले काम सुरू आहे. 
राहुल जगताप म्हणाले,  कुकडीकडे शिल्लक असली तरी बाजारपेठेत साखरेला उठाव नाही.  

अशा परिस्थितीत कर्डीले यांनी चांगल्या भावनेने कारखान्यास मदत केली आहे. त्यामुळे कुकडी साखर कारखाना सभासदांना साखर आणि कामगारांना बोनस देऊन देऊन दिवाळी गोड करणार आहे. 

जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची भाषणे झाली. 

अण्णा शेलार, संजय जामदार, बाळासाहेब नाहाटा, हरिदास शिर्के, दीपक भोसले, मनोहर पोटे, सिध्देश्वर देशमुख,  कैलास पाचपुते, अॅड सुभाष डांगे, सतिश पोखर्णा, अतुल लोखंडे, समीर बोरा, संभाजी देवीकर, ऋषीकेश गायकवाड, प्रशांत गोरे, सतीश मखरे, जिल्हा बँकेचे कार्यकरी संचालक रावसाहेब वर्पे कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Co-operative Bank will help the kukadi factory