esakal | Ahmednagar | डिजिटल उताऱ्यात जिल्हा अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

Digital-Satbara

Ahmednagar | डिजिटल उताऱ्यात जिल्हा अव्वल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना यावर्षी डिजिटल सात-बारा उतारा घरोघरी जाऊन मोफत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांपैकी ५५१ गावांमध्ये महात्मा गांधी जयंतीपासून (ता. २) प्रारंभ झाला आहे. ३७ हजार ५०० सात-बारांचे वाटप करण्यात आले आहे. १४ लाख पाच हजार ५०० कृषी खातेदारांपैकी साडे तीन लाख सात-बारा उताऱ्यांचे पी.डी.एफ. पूर्ण झाले असून राज्यात नगर जिल्हा पहिल्या क्रमांकार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आदींसह महसूल अधिकारी उपस्थित होते. सात-बारा उतारा पाहिजे असल्यास तलाठ्यांना रेकॉर्ड पासून स्वत हस्ते सात-बारा उतारा लिहून द्यावा लागत होता. या पद्धतीने उतारा देण्यासाठी खूप वेळ लागत होता. महसूल विभागातील रेकॉर्डचे अद्ययावत करण्याची मोहिम राज्य शासनाने सुरू केली आहे. सर्व सात-बारा उताऱ्यांचे डिजिटल केले जाणार आहेत. त्यामुळे संगणकाच्या सहाय्याने तात्काळ सात-बारा उतारा देणे शक्‍य होणार आहे. जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यांचे डिजिटल करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी खातेदार शेतकऱ्यांना डिजिटल सात-बारा उतारा घरपोहच मोफत दिला जाणार आहे. या उताऱ्यासमवेत अभिप्राय नोंदविण्यासाठी फॉर्म दिला जाणार आहेत. शेतकऱ्यांना आपला सात-बारा उतारा पाहून क्षेत्र, नाव आदींमध्ये काही दुरूस्ती करण्यासाठी हा अभिप्राय फॉर्म भरून द्यायचा आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त मोफत सात-बारा उतारे वाटपास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांपैकी ५५१ गावांमध्ये प्रारंभ झाला आहे. ३७ हजार ५०० सात-बारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. जमावबंदी आयुक्‍तालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोफत सात-बारा उतारा देण्यासाठी पी.डी.एफ. करावे लागत आहेत.१४ लाख पाच हजार ५०० कृषी सात-बारा उताऱ्यांपैकी साडे तीन लाख सात-बारा उताऱ्यांचे पी.डी.एफ. पूर्ण झाले आहे.

दीड महिन्यात सर्वांना सात-बारा

महसूल विभागीय आयुक्‍तांनी मोफत सात-बारा वाटपाचे काम ता. १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्या दीड महिन्यांना सर्वांना सात-बारा उतारे मिळणार आहेत. या उताऱ्यामध्ये चुका झाल्यास असल्यास दुरुस्ती करण्यास संधी मिळणार आहे.

loading image
go to top