

Vehicles queue up at Hivargaon Pawasa toll plaza as people travel home for Diwali.
esakal
संगमनेर: दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्याने, तसेच लक्ष्मीपूजनाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने नागरिकांची आपापल्या गावी जाण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त पुणे परिसरात वास्तव्यातील अनेक नागरिक दिवाळी आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा करण्यासाठी गावाकडे रवाना होत आहेत. याचा परिणाम पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत आहे. शनिवारी (ता. ७) सकाळपासून या महामार्गावर हजारो वाहनांची गर्दी झाली होती. पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.