
सोनई : आळंदी आणि देहूच्या धर्तीवर नेवासेतून प्रथमच निघणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पंढरपूर दिंडीसाठी वीस लाख रुपये किमतीच्या पालखी रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कात्रज (पुणे) येथील माउली आर्टस् येथे सर्व सुट्या भागाचे काम पूर्ण होत आले असून, पुढील आठवड्यात रथ नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दाखल होणार आहे.