
बरड : नेवासा येथील पैसखांबाजवळ ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरी सांगितली. त्या स्थानापासून ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’चा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. ज्ञानेश्वरीच्या विचारांच्या या पालखी सोहळ्याला पहिल्या वर्षापासूनच भरभरून प्रतिसाद मिळत आहे.