पाणी अंगावर उडाले म्हणून डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण 

सुर्यकांत वरकड
Sunday, 27 December 2020

पाइपलाइन रस्त्यावरील गावडे मळा परिसरात पाणी अंगावर उडाले म्हणून चौघांनी जणांनी एका डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण केली.

अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील गावडे मळा परिसरात पाणी अंगावर उडाले म्हणून चौघांनी जणांनी एका डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण केली. ही घटना आज सकाळी घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सुवर्णा गावडे, विवेक गावडे अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत डॉ. अक्षयकुमार अनिल साठे (रा. साफल्य निवास कांदबरी नगरी, पाइपलाइन रोड, नगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आज सकाळी घराच्या कंपाउंडमध्ये बसलो असताना वरील आरोपीपैकी एकजण त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीला पाणी मारीत होता.

ते पाणी माझ्या अंगावर आले. "तुम्ही दुसरीकडे पाणी मारा' असे त्याला सांगितले. त्याला त्याचा राग आल्याने त्याने कंपाउंडमध्ये घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. अन्य आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor beaten in village gardener in town