esakal | डॉक्टर दाम्पत्याने कोविड केअर सेंटरला दिली ५० हजारांची औषधे
sakal

बोलून बातमी शोधा

The doctor couple donated 50000 Rs worth of medicines to covid Care Center

मोठ- मोठी लग्न, साखरपुडा समारंभ, वाढदिवस पार्ट्या असा अनेक आयोजित कार्येक्रमातून लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते.

डॉक्टर दाम्पत्याने कोविड केअर सेंटरला दिली ५० हजारांची औषधे

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : मोठ- मोठी लग्न, साखरपुडा समारंभ, वाढदिवस पार्ट्या असा अनेक आयोजित कार्येक्रमातून लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. मात्र कोरोना महामारी काळात अशा समारंभ व पाट्यांना आता सामाजिक स्वरूप आले आहे. 

नेवासे फाटा येथील 'श्वास'चे संचालक डॉ. अविनाश काळे यांनी मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कोविड रुग्णांना अत्यावश्यक असलेले सुमारे पन्नास हजार रुपयांचे औषधांची किट नेवासे कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना वाटप करून वैद्यकीय क्षेत्रात चांगला पायंडा पाडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डॉक्टरांना समाजात कोरोना योद्धा म्हणून गौरव होतो. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णाकडून लाखो रुपये घेत असल्याचा आरोप डॉक्टरांवर होत आहे.

काही डॉक्टर समाजसेवा म्हणून आपले खाजगी रुग्णालयाबरोबरच कोविड सेंटरवरही रुग्णांना सेवा देत आहेत. डॉ. अविनाश काळे हे त्यापैकी एक त्यांचे नेवासे फाटा येथे श्वास हॉस्पिटल आहे. मात्र ते दिवसभर नेवासे फाटा येथील कोविड केअर केंद्रावर सेवा देतात. त्यांनी लॉकडाऊन काळापासून ते शेकडो गरीब रुग्णांना मोफत उपचार देत आहेत. या दरम्यान रुग्णांसाठी आवश्यक असणारे महागडे औषधांचा तुटवडा अनेकवेळा जाणावल्याने त्यांनी त्यांच्या निष या मुलाचा पहिल्या वाढदिवसानिमित्त सेंटर मधील रुग्णास पन्नास हजार रुपयांचे औषध किट वाटप केली.

दरम्यान देवगड येथे संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ही औषधे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आली. यावेळी यावेळी डॉ.अविनाश काळे, डॉ. प्रियांका काळे,गणेश लंघे, संतसेवक चांगदेव साबळे, संदीप साबळे मारुती साबळे उपस्थित होते.

हीच खरी ईश्वर सेवा : गुरुवर्य भास्करगिरी
डॉ. अविनाश काळे दाम्पत्यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न कोरोना रुग्णांना औषधे देऊन चांगला पायंडा पाडला. समाजाची हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि ती त्यांच्या हातून घडली. असल्याचे श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर