
अहिल्यानगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र समितीच्या कामकाजाबाबत काही स्वयंसेवी संस्था आक्षेप घेत समितीस वेठीस धरत होत्या. त्यामुळे या समितीने १ फेब्रुवारीपासून कामकाज थांबविले होते. प्रहार दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी व जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाणगे यांनी समितीच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या समितीमधील डॉक्टरांनी पुन्हा कामकाजास सुरुवात केली आहे.