महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवजsakal

संगमनेर (जि. नगर) : ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी विविधता आहे. कोकणातील हापूस, जळगावचे भरीत वांगे, मराठवाड्यातील केसर आंबा, पुण्यातील इंद्रायणी तांदूळ, नागपूरची संत्री अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पिके राज्यात आहेत. महाराष्ट्राच्या या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज
Pune : नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यु

ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मंत्री थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, ॲग्रोवन डिजिटलचे कन्टेन्ट चीफ रमेश जाधव, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्रामध्ये जगात नवीन काय चालू आहे हे पाहण्यासाठी शेतकरी ॲग्रोवन वाचतात, असे थोरात म्हणाले. ‘‘ॲग्रोवनच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा धांडोळा घेतला आहे. ॲग्रोवनचा प्रत्येक दिवाळी अंक एका विशिष्ट थीमवर केंद्रित असतो,’’ असे आदिनाथ चव्हाण म्हणाले.

दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध

सकस आणि दर्जेदार आशयासाठी ॲग्रोवनचा दिवाळी अंक ओळखला जातो. यंदाचा दिवाळी अंक महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक अन् पर्यावरणपूरक अशा वैशिष्ट्यपूर्ण पीकसंपदेचा रंजक धांडोळा घेणारा आहे. हा दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com