चेन्नई व अहमदाबादकडे बोट दाखवून मुंबईची जबाबदारी झटकू नका

अशोक मुरुमकर
Friday, 25 September 2020

चेन्नई व अहमदाबादकडे बोट दाखवून मुंबईची जबाबदारी झटकू नका, असे वक्तव्य करत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे.

अहमदनगर : चेन्नई व अहमदाबादकडे बोट दाखवून मुंबईची जबाबदारी झटकू नका, असे वक्तव्य करत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे.

पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची विविध कारणे देतानाच अहमदाबाद व चेन्नईमध्ये पाणी तुंबते तेव्हा विरोधक गप्प का बसतात?, असा सवाल सामनातून करण्यात आाला आहे, त्याला शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी सावंद साधत त्यांनी उत्तर दिले आहे.

आमदार विखे पाटील म्हणाले, मुंबईत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या काळात त्यांना मुबंईचे प्रश्न का सोडविता आले नाहीत. दुसरीकडे बोट दाखवून आपले अपयश झाकता येत नसते. मुंबईत पाणी तुंबण्याचे अपयश तुमचेच आहे. अहमदाबाद- चेन्नईत कसे चालते, असा प्रन विचारून शिवसेना मुंबईतील जबाबदारी टाळू शकत नाहीत. हे अपयश तुमचेच आहे. हजारो कोटी खर्च करूनही मुंबई कशी तुंबते? नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ करून घेतले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आपण पूर्वी विधानसभेत हा विषय उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, राज्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नियम निकषात अडकून न पडता ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी. एखाद्या भागात २४ तासात ६५ मिलीमीटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळण्याचा जुना नियम आहे. तो बदलण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont shrug off the responsibility of Mumbai by pointing fingers at Chennai and Ahmedabad