
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहर व उपनगरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चौकाचौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावंदना देण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सायंकाळी मार्केट यार्ड चौक येथे पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. आठ संघटनांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.