Amol Khatal : डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणार: आमदार अमोल खताळ; सामाजिक न्यायमंत्र्यांकडून २० लाख निधी उपलब्ध
Sangamner News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या तालुक्याचे लोकप्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे पुढील काळात माझा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील.
MLA Amol Khatal announces ₹20 lakh grant for the construction of Dr. Babasaheb Ambedkar’s statue.Sakal
संगमनेर : शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.