शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान गरजेचे : डॉ. नरेंद्र घुले

डॉ. नरेंद्र घुले
डॉ. नरेंद्र घुले

नेवासे (अहमदनगर) : शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी ज्ञानार्जनासाठी डिजिटल तंत्रज्ञाच्या वापराविषयी माहिती करून घेत त्याचा उपयोग शेती उत्पन्न वाढीसाठी करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. नरेंद्र घुले यांनी केले. 

नेवासे तालुक्यातील भेंडे येथील ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके, दहिगाव-ने) यांच्यातर्फे आयोजित शास्त्रीय सल्लागार समितीच्या ऑनलाईन-ऑफलाईन बैठकीत ते बोलत होते. बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अटारी पुणे झोन आठचे शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, काकासाहेब शिंदे, इफको'चे डी. बी.देसाई, भारतीय ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, रेशीम विभागचे सहाह्यक संचालक बी. डी. डेंगळे, डॉ. भगवान देशमुख, नाबार्ड चे शिलकुमार जगताप, जिल्हा बियाणे प्रमाणपत्र अधिकारी डी.एस.बरढे, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. एम. बी. लाड सहभागी झाले होते. 

डॉ. विश्वनाथा म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन कराव्यात. यावेळी डॉ.अमोल भालेराव, कृषी अधिकारी शिवाजी जगताप, केव्हीकेचे प्रमख डॉ. एस. एस. कौशिक, माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.
 
बैठकीस हुकुम नवले, काकासाहेब काळे, रतन मगर, रेवणनाथ उकिर्डे, संजय तनपुरे, काकासाहेब घुले, डॉ. दिलीप बर्डे आदी उपस्थित होते. बैठक यशस्वी होण्यासाठी केव्हीके'चे शास्त्रज्ञ नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, वैभव नगरकर, प्रविण देशमुख, अनिल देशमुख यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले तर आभार राहुल पाटील यांनी मानले. 

संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com