

Legacy of Compassion: Dr. Shelke's Children Donate Parental Home for Social Causes
Sakal
पारनेर : डॉ.भावना आणि डॉ. अरविंद शेळके दांपत्याने मागील 5 दशके अहिल्यानगरच्या पंचक्रोशीतील रुग्णांची आणि वंचितांची आपल्या ज्ञान आणि क्षमतांद्वारे निरपेक्ष सेवा केली. त्यांच्या संस्कारांना स्मरून त्यांची मुलगी डॉ. कविता करीर आणि मुलगा समीर यांनी डॉ शेळके यांचे भिंगार येथील घर सामाजिक उपक्रमासाठी नूकतेच समर्पित करून एकाद्भुत प्रेरणा समाजाला दिल्याचे प्रतिपादन नगर जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.