

शिर्डी : शिर्डीच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्थेसाठी साईसंस्थानने तिरूपती देवस्थानचे अनुकरण करावे. तेथे पहाटे चार ते सहा या वेळातच व्हीआयपी दर्शन व्यवस्था उपलब्ध आहे. तसे शिर्डीत झाले तर मुक्कामी रहाणाऱ्या व्हीआयपी दर्शनार्थी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळेल. साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अभ्यास करावा, असे मत माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. काल येथे एका जाहिर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.