Sujay Vikhe Patil : मोफत भोजनाने गुन्हेगारी वाढल्याचे सिद्ध : डॉ. सुजय विखे पाटील
तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन आरोपींनी लूटमार करीत चाकू हल्ले चढविले. त्यात साई संस्थानचे दोन कर्मचारी जागीच ठार झाले. एक स्थानिक रहिवासी गंभीर जखमी झाला. या घटनांची माहिती समजताच डॉ. विखे पाटील दाखल झाले.
Dr. Sujay Vikhe Patil raises concerns about the impact of free meal programs on crime rates, urging a review of welfare initiatives.Sakal
शिर्डी : साई संस्थान मोफत भोजन देत असल्याने शिर्डीत गुन्हेगारांची संख्या वाढली, हे आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याबाबत आपण केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ उठला होता. येत्या पंधरा दिवसांत शहरातील गुन्हेगारीचा समूळ नायनाट करू.