अवैध वाळूउपसा होऊ देणार नाही : डॉ. सुजय विखे पाटील

Dr. Sujay Vikhe Patil has said said that illegal sand extraction will not be allowed
Dr. Sujay Vikhe Patil has said said that illegal sand extraction will not be allowed

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्याने वाळुचोरी राजरोसपणे सुरू आहे. हा सर्व अवैध वाळू व्यवसाय लवकरात लवकर बंद व्हावा, यासाठी सर्व पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे. यापुढे तालुक्‍यात अवैध वाळूउपसा होऊ देणार नाही, तसे झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
 
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुचवलेल्या वासुंदे चौक ते बसस्थानक या रस्त्यास खासदार डॉ. विखे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन मंडळांतर्गत 25 लाख रूपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या भूमिपूजनावेळी विखे बोलत होते. सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, अमोल साळवे, अरूण ठाणगे, सचिन सैद उपस्थित होते. 

सुजीत झावरे यांनी मांडओहळ धरणातील कान्हुरपठारसह सोळागाव पाणी योजना सुरू करण्याची मागणी केली. याकरीता सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात यावा, असे ते म्हणाले. यावर विखे यांनी हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून पारनेर तालुक्‍यातील विविध रस्त्यांसाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. डीपीडीसी मधूनही पारनेर तालुक्‍यातील विविध रस्ता कामांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

मांडओहळ धरणातून कार्यान्वित असलेली कान्हूर पठारसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना थकीत विजबिलांमुळे बंद आहे. त्यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांच्या सरपंचाबरोबर बैठक घेऊन कायमचा मार्ग काढू.
 - डॉ. सुजय विखे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com