
पारनेर : तालुक्यातील पठारभागावर पाणी आणणार, अशा आश्वासनावर तालुक्यात १० आमदार होऊन गेले. मात्र त्यांना पाणी आणता आले नाही. मात्र तालुक्यात पाणी आणण्याचा जो शब्द (कै.) बाळासाहेब विखे पाटलांनी तालुक्याला दिला होता, तो शब्द त्यांचे चिरंजीव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करतील, असा शब्द मी तालुक्याच्या शेतकऱ्यांना देतो, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.