
कोपरगाव तालुक्यासाठी दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन असलेल्या एसटी बस स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.
कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यासाठी दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन असलेल्या एसटी बस स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. तालुक्याचा ऐतिहासिक व पौराणिक वारसा संभाळून पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सदर नूतन बसस्थानकावर चित्ररूपी तालुक्यातील धार्मिक स्थळांचा नकाशा रंगविल्यास तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळेल.
अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने बस आगार प्रमुख अभिजीत चौधरी यांना देण्यात आले.
शिवसेना पदाधिकारी, मुंबादेवी तरूण मंडळ, गांधीनगर विभागाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात त्यात म्हंटले की, कोपरगावातील बसस्टॅन्डचे नविन बांधकांम पुर्णत्वाकडे असल्याने सदर कामात शहराच्या आसपासच्या ऐतीहासीक धार्मिक स्थळाची चित्ररुपी माहीती बस स्थानकात रंगविल्यास शहरात धार्मिक पर्यटन व्यवसाय वाढीस चालना मिळेल. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख मनोज कपोते, मुंबादेवीचे सुनिल खैरे, संदीप दळवी, राजेंद्र खंडागळे, मनोज विसपुते, विनायक खंडागळें, गांधीनगरचे माजी शहरप्रमुख शिवनारायण परदेशी, शेखर जाधव, रमेश टोरपे आदी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर