
सोनई : महालक्ष्मीहिवरे (ता. नेवासे) येथे गायके वस्तीवर विहिरीचे काम करताना मजूर गोरख बन्सी गायके (वय ३५) यांचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाला. बुधवारी (ता.३०) दुपारी चांदे रस्त्यावरील गोरख त्रिबंक गायके यांच्या विहिरीचे काम सुरू असताना खाली काम करताना गोरख गायके यांच्या डोक्यात दगड पडल्याने त्यांच्या डोक्याला खोलवर मोठी जखम होऊन अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाला.