Drone Camera : कार्बन फायबर साहित्यापासून बनवला ड्रोन कॅमेरा

संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकीमधील इलेक्ट्रीकल विभागात शिक्षण घेत असलेल्या सुमेध गोरक्षनाथ रहाणे या विद्यार्थ्याने कार्बन फायबर साहित्यापासून ड्रोन कॅमेरा बनवला आहे.
Sumedh Rahane
Sumedh Rahanesakal

- राजू नरवडे

संगमनेर - संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकीमधील इलेक्ट्रीकल विभागात शिक्षण घेत असलेल्या सुमेध गोरक्षनाथ रहाणे या विद्यार्थ्याने कार्बन फायबर साहित्यापासून ड्रोन कॅमेरा बनवला आहे. त्यामुळे त्याच्या उत्तुंग भरारीने अमृतवाहिनीच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा खोवला आहे.

चंदनापुरी येथील सुमेध रहाणे याला इलेक्ट्रीकलची आवड असल्याने त्याने तीच शाखा निवडली. अभ्यासक्रमात हा विषय असल्याने त्याने हा ड्रोन कॅमेरा बनविण्याचे ठरवले होते. त्यासाठी लागणारे साहित्य जपान, तैवान या ठिकाणांहून मागवले. त्यानंतर ड्रोन कॅमेरा बनवण्यास सुरुवात केली आणि अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत ड्रोन कॅमेरा बनवला. या ड्रोनसाठी एक हजार मिली अ‍ॅपर लिथियम पॉलिमर बॅटरी बसवली आहे.

ब्रसलेस डिसी या चार छोट्या मोटारी बसविण्यात आल्या आहे. यातून परिपूर्ण झालेला ड्रोन कॅमेरा एक किलोमीटर अंतर उंच जाण्यासाठी फक्त दीड सेकंद वेळ लागत आहे. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी या ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे. यासाठी त्याला वैष्णवी सुरेश वाळके, खुशी राजेश परदेशी, प्रमोद राजेंद्र घारे यांनी मदत केली असून, इलेक्ट्रीकल डिपार्टमेंटमधील सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

आंबेगाव बुद्रुक येथे सुक्या सदर ड्रोन कॅमेरा बनविण्यासाठी मला आईवडिलांनी जवळपास ४५ हजार रुपयांची मदत केली आहे. उर्वरित रक्कम मला साथ देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. भविष्यात मला भारतीय संरक्षण क्षेत्रात जायचे आहे म्हणून मी हा विभाग निवडला आहे. आई-वडिलांचे जे स्वप्न होते ती मी पूर्ण करणार आहे.

- सुमेध रहाणे (विद्यार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com