esakal | कोरोनामुळे यंदा ऑनलाइन गणेशमूर्ती खरेदीला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Due to corona prefer to buy Ganesh idols online this year

कोरोनामुळे जनजीवन बदलले असुन सण- उत्सव साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. दरवर्षी सार्वजनिक उत्सव सोहळे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

कोरोनामुळे यंदा ऑनलाइन गणेशमूर्ती खरेदीला पसंती

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे जनजीवन बदलले असुन सण- उत्सव साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. दरवर्षी सार्वजनिक उत्सव सोहळे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच येवुन ठेपलेला गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीत गर्दी विरहित आणि रोग विरहित साजरा केला जात आहे. 

दरवर्षी गणेशोत्सवात मंडळामध्ये स्पर्धा लागलेली असते. भव्य मिरवणुका, ढोल-ताश्याचा गजर, भव्य मुर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई असा माहौल यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनामुळे दिसणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अनेक मंडळांनी
सार्वजनिक गणेशोत्सवाला स्थगिती देत घरोघरी बाप्पाची स्थापना केली जाणार आहे.

त्यामुळे यंदा बाजारात मोठ्या मुर्ती दिसत नसुन छोट्या मुर्तीला पसंती मिळत आहे. गणेश मुर्ती संदर्भात प्रशासनाने सुचना केल्या असुन घरगुती गणेशोत्सवासाठी दोन फुट तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फुट मुर्ती असावी असे सांगितले आहे. यंदा मोठ्या मुर्तीची निर्मिती व विक्रीचे चक्र ठप्प झाले आहे. मोठ्या मुर्तीच्या कारागीरांनी यंदा छोट्या मुर्ती निर्मितीवर भर दिलेला होता.

आकर्षक लहान मुर्त्यांना घरगुती गणेशोत्सवासाठी मोठी मागणी असल्याने त्याकडे अनेक मुर्तीकार वळाले आहे. येथील कुंभार गल्लीतील अनेक मुर्तीकारांनी दरवर्षी सारख्या यंदा मोठ्या मुर्त्या तयार केलेल्या दिसत नाही. सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आल्याने छोट्या मुर्ती तयार करुन ऑनलाईन विक्री केली जात आहे. अनेक नागरीकांनी फोनवर मुर्ती बुक केली असुन त्याची रक्कमही ऑनलाईन स्वरुपात जमा केली आहे.

सोशल डिस्टसिंग राखण्यासाठी ऑनलाईन फंटा समोर आला. आणि त्याचा उपयोग येथील काही मुर्ती विक्रेत्यांनी करुन घेतला आहे. सोशल मिडियाच्या माध्यामातुन नागरीकांपर्यंत जोडल्याने अनेक ग्राहक फोनवरुन मुर्ती बुक करीत आहे. मुर्तीचे पैसे ऑनलाईन स्वरुपात जमा होत असल्याने ऑनलाईन मुर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आविका आर्टचे मृर्तीकार अनिकेत दळे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top