कोरोनाने भाऊ- बहिणेच्या प्रेमात व नात्यातही दुरावा;  ऑनलाईन भाऊबीजवर भर

मार्तंड बुचुडे
Monday, 16 November 2020

भाऊबीज नेहमीप्रमाणे बाजारात दिपावली निमत्ताने आता मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

पारनेर (अहमदनगर) : भाऊबीज नेहमीप्रमाणे बाजारात दिपावली निमत्ताने आता मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. मात्र कोरोनामुळे भाऊबीजेच्या प्रेमातही आंतर पडले आहे.

अनेक भावांनी बहिणासाठी ऑनलाईन भाऊबीज (भेट) पाठऊन यंदाच्या वार्षी भाऊबीजेसाठी तु माहेरी आली नाही तरी चालेल, अशी विनवणी करत आपल्या बहिण्याच्या प्रेमाला आवर घातला आहे. त्यामुळे कोरोनाने भाऊबहिणेच्या प्रेमात व नात्यातही दुरावा निर्माण केला आहे.

दिपावली प्रमाणेच भाऊबीज हा अतीशय उत्साहात साजरा होणारा सण आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील प्रेमळ आनंदाचा व एकमेकांना भेटण्याचा व भेटवस्तू देण्याचा वर्षभऱातील एक चांगला असा उपक्रम आहे. बहीण भावाकडून भाऊबीजेच्या दिवशी भावास ओवळून वर्षभऱातील आपल्या  हक्काची  भेट घेत असते.  व भाऊ सुद्धा आपल्या बहिणीसाठी एक चांगली भेट देत असतो. इतकेच नव्हे तर अता बहीण  सुद्धा भावास काहीतरी अनोखी भेट देण्याची नव्याने प्रथा पडली आहे.

मात्र, यंदा कोरोनामुळे बहीणीला भावाकडे म्हणजेच आई वडीलांकडे माहेरी जाऊ का नको अशी शंका निर्माण होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे भावाला बहीणीने व आई वडीलांनाही मुलीने यावर्षी माहेरी नाही आले तरी चालेल असे वाटू लागले आहे. कोरोनाची भीती अध्यापही लोकांच्या मनातून गेली नाही. कोरोणामुळे  प्रतेक कुटुंब आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. त्यामुळे यंदा भाऊबीजही कशी साजरी करावी या चिंतेत अनेक कुटुंब आहेत.  त्यातूनच भाऊ व बहिण्याच्या नात्यात व प्रेमातही दुरावा निर्माण  झाला आहे.

कोरोनामुळे अनेक नात्यात, मित्र मौत्रिणी तसेच  शेजारी पाजारी यांच्यात दुरावा तयार झाला आहे. अता तर थेट बहिण भाऊ यांच्या नात्यात व प्रेमातही कोरोनाने दुरावा निर्माण केला आहे. अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी आपली भाऊबीज ऑनलाईन पाठऊन भाऊबीज साजरी करण्याचे ठरविले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona this year Diwali is also a brother sister relationship

टॉपिकस
Topic Tags: