कांद्याचे बाजारभाव कमी, तरी लागवड मात्र मोठ्याप्रमाणात

Due to heavy rainfall in Parner taluka onion cultivation by farmers
Due to heavy rainfall in Parner taluka onion cultivation by farmers

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने व खरीपाची काही पीके अती पाऊसामुळे वाया गेली आहेत. परिणामी अता शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव कमी असले तरी कांदा लागवड मात्र मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. 

गतवर्षी तालुक्यात सुमारे 25 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. गतवर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला होता हा अनुभव पाठीशी ठेऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लावड करत आहेत. मात्र कांदा लागवडीवर कांदा रोपांची कमतरता भासल्याने निर्बंध येत आहेत.

पारनेर तालुका तसा सततचा दुष्काळी तालुका, तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीपाबरोबरच रब्बीची विविध पीके घेतली जातात. मात्र कुकडी कालवा तालुक्यात आला आणि या परिसरात ऊसाची लागवड सुरू झाली. परंतू पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना म्हणावा तसा कधीच चालला नाही. तसेच ऊसाला खर्चाच्या प्रमाणात बाजारभावही मिळाला नाही. त्यामुळे कुकडीकालाव्याच्या लाभ क्षेत्रातील गावे सुरूवातीस ऊस शेतीकडे वळली मात्र अता शेतकरी पुन्हा इतर पीकांकडे वळला आहे.

तालुक्यात या पुर्वी खरीपाच्या व रब्बीच्या पीकात बाजरी ज्वारी यासारखी पीकेघेतली जात होती त्या नंतर मात्र बटाटा कांदा तसेच फुलशेती व फळबागे कडे वळाले होते. मात्र फळबागावर पडणारी रोगराई व मोठ्या खर्चीक असल्याने कमी खर्चात व कमी कालावधीत अधिक पैसे देणारे पीक म्हणून कांदा पीकाकडे पाहीले जाते व त्यामुळे अता मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा पीकाकडे वळले आहेत. 

गेली काही वर्षापासून कांद्यास बाजारभावही सातत्याने चांगला राहीला आहे. अधून मधून कांद्यास बाजारभाव कमी झाले तरी शेतकरी अनेक या पीकाला सरावला आहे. सध्या पारनेर, सुपे, हंगे, भाळवणी व टाकळी ढोकेश्वर कान्हूरपठार या कोरडवाहू पट्यात पाऊसावर व कोरड्यात अता कांदा लागवड सुरू आहे. तसेच कुकडी कालव्याखालील वडझिरे, निघोज, वडगाव, जवळ, लोणीमावळा, आळकुटी, वडझीरे, देवीभोयरे, राळेगण थेरपाळ या परीसरातही मोठ्या प्रमाणात कांदा सुरू आहे. 
मध्यंतरी सततच्या पाऊसामुळे अनेक गावातील कांदा रोपे वाया गेली आहेत त्यामुळे गतवर्षी पेक्षा यंदा कांदा लागवड पाऊस चांगला होऊनही केवळ कांदा लागवड रोपांअभावी घटणार आहे.

कांदा लागवडीसाठी माणशी तीनशे ते साडेतीनशे रूपये रोजंदारी द्यावी लागत आहे. तर सध्या तालुक्यात मजूर मिळत नसल्याने थेट आळफाटा परीसरातून कांदा लागवडीसाठी मजूर आणले जात आहेत. त्यांना एकरी नऊ हजार रूपये प्रमाणे लागवडीसाठी मजूरी देऊन कांदा लागवड केली जात आहे. मजुरही कोरड्यात कांदा लागवडीसाठी कमी तर पाण्यात लावण्यासाठी जास्त मजूरीचे दर द्यावे लागत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com